पेडगाव येथे शॉर्टसर्किटने उसाला आग

वडूज, दि. 4 (प्रतिनिधी) -पेडगाव, ता. खटाव येथे वीज खांबावर शॉर्ट सर्किट होऊन काढणीस आलेल्या ऊस पिकास आग लागली. या आगीत तीन एकर ऊस जळून खाक झाला आहे. याबाबत माहिती अशी की, सोमवार, दि. 3 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास येथील लवान नावाच्या शिवारातील गट न. – 872 मध्ये विजेच्या खांबांवर शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत माणिकराव दगडू जगदाळे यांचा दोन एकर व विलास सर्जीराव साळुंखे यांचा एक एकर असा काढणीला आलेला एकूण तीन एकर ऊस जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, गावकामगार तलाठी श्रद्धा निकम, कोतवाल संपत पाटोळे, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी जावून पाहणी करून पंचनामा केला. पोलीस पाटील विजय जगदाळे यांनी वडूज पोलीसांना खबर दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)