पेट्रोल 17 पेसै, तर डिझेलचे दर 16 पैशांनी स्वस्त 

मुंबई – पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही दिवसांपासून सातत्याने घट होत आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 17 पेसै, तर डिझेलचे दर 16 पैशांनी कमी झाले आहे. नवी दिल्लीत पेट्रोल 77.89 रुपये आणि डिझेल 72.58 रुपयांनावर आले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 18 ऑक्‍टोबरपासून घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याने इंधनाचे दर घसरले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या एका महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती 16 डॉलरहून अधिक कमी झाल्या आहेत. कच्च्या तेलाचे भाव ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात 86 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत पोहचले होते. त्यावेळी पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केली होती, त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली होती. मात्र सध्या कच्च्या तेलाचे भाव 16 डॉलरने घसरुन 70 डॉलर प्रति बॅरल इतके झाले आहे. म्हणून इंधनाचे दर कमी होत आहेत.

मात्र, येत्या काळात तेलाच्या किमतीत वाढ होण्याच शक्‍यता वर्तवली जात आहे. अमेरिकेने इराणकडून तेल खरेदीवर बंदी घातली आहे. इराणवरील बंदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊ शकते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)