पेट्रोल ७ तर डिझेल ५ पैशांनी स्वस्त

मुंबई : इंधनदरवाढीनंतर आता वाहनचालकांना किंचित दिलासा देण्याचा प्रयत्न होत आहे. पेट्रोलचे दर सात पैसे, तर डिझेलचे दर पाच पैशांनी कमी झाले आहेत. सलग 16 दिवस इंधनाच्या दरात वाढ झाल्यानंतर, काल म्हणजे सतराव्या दिवशी इंधन दर 60 पैशांनी कमी झाल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे वाहनचालकांनी सुटकेचा निश्वासही टाकला होता, मात्र दुपारी तेल कंपन्यांनी कोलांटउडी मारली. इंधन दरात केवळ एक पैशांची कपात झाल्याचं सांगितलं.

दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर ७८.३५ रूपये आणि डिझेल ६९.२५ रूपये असा आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर ८६.१६ रूपये तर डिझेल ७३.७३ रूपये असा दर आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
2 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)