पेट्रोल पंपावर दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा

नागठाणे, दि. 16 (प्रतिनिधी) – वळसे, ता. सातारा येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून कर्मचाऱ्याला शिवीगाळ व दमदाटी करत पैसे न देता पळून गेल्याप्रकरणी कराड येथील एन.एस.यु.आय.च्या माजी प्रदेशाध्यक्षाविरुद्ध अदखल पात्र गुन्हा बोरगाव पोलीसात दाखल झाला आहे. शिवराज बापूसाहेब मोरे असे त्याचे नाव आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शिवराज मोरे हा वळसे येथील पेट्रोल पंपावर त्याच्या ताब्यातील 5 ते 6 गाड्या घेऊन डिझेल भरण्यासाठी आला होता. गाडीत 1000 रुपयांचे डिझेल टाकून त्याने गाडी तशीच पुढे नेली. यावेळी पंपावरील कर्मचाऱ्यांनी गाडी अडवून पैसे मागितले असता त्यांनी कर्मचाऱ्यास शिवीगाळ व दमदाटी केली व गाड्याचा ताफा घेऊन पैसे न देता निघून गेला. या घटनेची फिर्याद संजय दिनकर कदम या कर्मचाऱ्याने या बोरगाव पोलिसात दिली असून पुढील तपास भगवान इंगुळकर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)