पेट्रोल पंपावर एटीएमचा वापर करणारे सहाजण जाळ्यात

वाठारस्टेशन पोलीस स्टेशनची कारवाई
सातारा, दि. 4 (प्रतिनिधी)
वाठार पोलीस ठाणे हद्दीतील स्वामी पेट्रोप पंपावर काही अज्ञात इसमांनी एटीएम कार्डचा वापर करून स्वॅप मशिनचा वापर करून 6 हजार रूपयांचे पेट्रोल गाडीत भरले. सदरची बाब फिर्यादी सदाशिव मल्लिशम बेलगुंफे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने याबाबत फिर्याद दिली. त्यानंतर नमुद संशयीकाडून एसबी, युनियन बॅक व कार्पोशन बॅंकेचे एमटीम कार्ड व 1 लाख 32 हजाराची रोकड जप्त केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सातारा-लोणंद रस्त्यावरील वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या स्वामी पेट्राल पंपावर संशयीतांनी 6 हजार रूपयांचे पेट्रोल गाडीत भरले त्यानंतर फिर्यादीच्या लक्षात आले की, हे पैसे आपल्या पंपाच्या खात्यात जमा झाले नाहीत. त्यानंतर त्यांनी ताडीने वाठास्टेशन पोलीस ठाण्यात फिर्यात दिली. गुह्याचे गांभीर्य घेवून वाठार पोलीस स्टेशनचे स.पो. मारुती खेडकर यांना सूचना दिल्यात ज्यांनी गोपनीय माहिती प्राप्त सहा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक केली असता त्यांनी सातारा व पुणे जित्ह्यातील लोणंद, फलटण, बारामती जेजूरी परीसरात अशाच पध्दतीने एटीएम व्दारे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अधिक चौकशी केली असताना, त्यांच्या विरोधात यापुर्वी गुन्हे दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा पदभार स्विकारल्यानंतर पो. नि. विजय कुंभार यांनी पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पो. अधिक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्या मागर्दर्खाली तातडीने तपास केला. या कामी त्यांना सपोनि त्यांना विकास जाधव, महेश पाटील, अतुल कुंभार, अजय झुंजार, सचीन जगताप यांच्यासह वाठार पोलीस ठाण्याचे रवी वाघमारे, संतोष जाधव, निलेश काटकर गणेश कचरे यांनी सहभाग घेतला. अशा प्रकारे कोणाची फसवणुक झाली असेल त्यांनी सातारा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सातारा पोलीसांनी केले असून नाशिक व जळगाव येथील विजय धोडीराम सूर्यवंशी, योगेश काळे, निलेश ब्राह्मण, अस्पाक दस्तगीर शेख, देविदास कतरू शिंदे, लक्ष्मीकांत केशवराव पाटील या सह आरोपींना अटक करून सातारा न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सदर घटना उघडकीस करण्यासाठी सातारा पोलीसांना यश आल्यामुळे पेट्रोल पंपधारक यांनी सुध्दा एटीएमव्दारे पेट्रोल भरल्यानंतर आपल्या खात्यात पैसे जमा झाल्याची खात्री करूनच विशेषत: जिल्ह्या बाहेरील वाहनांना सोडण्यात यावे, अशी विनंती काही पेट्रोल मालकांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)