पेट्रोल पंपांवर मिळणार एलीडीबल्ब, ट्यूबलाइट्‌स व सीलिंग फॅन्स

नवी दिल्ली -ग्राहकांना लवकरच पेट्रोल पंपांवर किरकोळ दरापेक्षाही स्वस्त दरात एलीडीबल्ब, ट्यूबलाइट्‌स आणि सीलिंग फॅन्स मिळणार आहेत. एलईडी बल्ब 66 रुपयांना, ट्यूबलाइट्‌स 230 रुपयांना आणि सीलिंग फॅन्स 1150 रुपयांना मिळू शकणार आहेत. तीन सरकारी ऑईल कंपन्या हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियमच्या देशभरातील पेट्रोल पंपांवर स्वस्त दरात एलईडी बल्ब, एलईडी ट्यूब लाईट्‌स आणि सीलिंग फॅन्सची विक्री करण्यात येणार आहे. संपूर्ण देशभरात या तिन्ही कंपन्यांचे मिळून 53,00 पेट्रोल पंप आहेत. मात्र या सर्वच पंपांवर या वस्तू उपलब्ध होणार आहेत, की नाही हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

या संदर्भातील सांमजस्य करारावर तीन ऑईल कंपन्या आणि ईईएसएल (एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड) यांच्यात आजच सह्या होणार होत्या, परंतु केंद्रीय पर्यावरण मंत्री मंत्री अनिल माधव दवे यांच्या यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे स्थगित करण्यात आले आहे.
ईईएसएल सरकारच्या ईएफपी (एफिशियंट लायटिंग प्रोग्रॅम-ऊर्जा कार्यक्षम कार्यक्रम)ची अंमलबजावणी करत आहे. ईईएसएल ऊर्जा कार्यक्षम एलईडी बल्ब, एलईडी ट्यूबलाईट्‌स आणि सीलिंग फॅन्सचे वितरण करत आहे.

पेट्रोल पंपांवर 230 रुपयांत मिळणाऱ्या एलईडी ट्यूबलाईटची बाजारात किंमत 600 ते 700 रुपये, तर 1150 रुपयांत मिळणाऱ्या सीलिंग फॅनची किंमत 1700 ते 1800 रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)