पॅरिस (फ्रान्स) – पेट्रोल दरवाढीच्या विरोधात संपूर्ण फ्रान्सभर लोकांनी शनिवारी आणि रविवारी तीव्र आंदोलन केले. 2034 ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये सुमारे तीन लाख लोकांनी भाग घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. आंदोलकांनी रस्त्यावर उतरून केलेल्या हिंसक निदर्शनात एक जण ठार झाला असून सुमारे 400 जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे. जखमींमध्ये 28 पोलीस कर्मचारी आहेत. पेट्रोलवरील कर वाढवल्याच्या विरोधात हे लोक निदर्शने करत होते. जखमीं झालेल्या 409 पैकी 14 जणांची अवस्था गंभीर असल्याचे सांगण्यात आहे.
जखमींमध्ये 28 पोलीस कर्मचारी आहेत. शनिवारी रात्री आंदोलकांनी 87 ठिकाणी रस्ता रोको केले होते. सुमारे 3500 लोकांनी रात्रभर रस्त्यावर ठाण मांडले होते. शनिवारी आणि रविवारी अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलीसांत चकमकी झाल्या. पोलीसांनी 157 जणांना अटक केली असल्याची माहिती गृहमंत्री ख्रिस्तोफर कॅस्टनर यांनी दिली. बहुतेक ठिकाणची आंदोलने ही यलो वेस्ट संघटनेच्या बॅनरखाली करण्यात आली. या दरम्यान अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची लोकप्रियता उतरणीला लागली असून त्यांच्या लोक्रप्रियतेत 25 टक्के घसरण झाल्याचे सांगण्यात आले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा