पेट्रोल, डिझेल येणार वायदा बाजारात

मुंबई – लवकरच पेट्रोल, डिझलेचा वायदा बाजारामध्ये समावेश होण्याची शक्‍यता आहे. पेट्रोलियम मंत्रालयाकडून इंडियन कमोडिटी एक्‍स्चेंजमध्ये पेट्रोल, डिझेलचा वायदा बाजार करण्यास मंजुरी देण्यात आली. आता सेबीकडून अंतिम परवानगी मिळणे बाकी आहे. सेबीच्या परवानगीनंतर पेट्रोल, डिझेल वायदा बाजारात खरेदी, विक्री करता येईल.

पेट्रोल, डिझेलच्या किमती घटल्यावर खरेदी करावी आणि वाढल्यास विक्री केल्यास नफा मिळू शकतो. कमोडिटी एक्‍स्चेंजमध्ये अनेक वस्तूंचा वायदा बाजार करण्यात येतो. अन्य वस्तूंच्या व्यवहाराप्रमाणे पेट्रोल, डिझेलचे व्यवहार होतील. वायदा बाजाराची मुदत संपण्यापूर्वी त्यांची विक्री करता येईल. वायदा बाजारात जास्त नफा मिळविता येता, मात्र जोखमीचे प्रमाणही अधिक असते. वस्तूच्या किमती वाढण्याऐवजी घटल्यास गुंतवणुकीतून तोटा होण्याची शक्‍यता असते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)