पेट्रोल, डिझेल दरवाढ विरोधात शिरूरमध्ये भव्य मोर्चा

शिरूर- शिरूर शहर आणि तालुक्‍यात पेट्रोल, डिझेल दरवाढ, गॅस दरवाढ जीवनावश्‍यक वस्तूंची दरवाढ या सर्व महागाईच्या विरोधात सोमवारी (दि.10) कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनता दल, अखिल भारतीय मराठा महासंघ या सर्व पक्षांच्या वतीने सोमवारी (दि.10) शिरूर शहर बंदचे आवाहन करून शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला.
या बंदला शिरूर शहरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी अनेक व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. यावेळी शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले यांना आंदोलन करत यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
सोमवारी (दि.10) सकाळी शिरूर बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास, डॉक्‍टर बाबासाहेब आंबेडकर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मोर्चा सुरुवात झाली. हा मोर्चा विरोधाची धार कार्यालयावर गेल्यानंतर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
यावेळी कॉंग्रेसचे जिल्हा खजिनदार महेश ढमढेरे, तालुका अध्यक्ष वैभव यादव, शहराध्यक्ष किरण आंबेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष सागर निंबाळकर, माजी अध्यक्ष संतोष भंडारी, दादाभाऊ वाखारे, युवकचे शहराध्यक्ष अमोल चव्हाण, राष्ट्रवादी वकील सेलचे अध्यक्ष रवी खांडरे यांसह आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)