पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात मंगळवारी कोल्हापुरात काँग्रेसचा मोर्चा

कोल्हापूर – पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढीविरोधात कॉँग्रेसच्या वती ने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्य व केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटीने राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षभरात गॅसच्या किमतीत  १९ वेळा वाढ झाली. पेट्रोल, डिझेलच्या किमती तर रोज वाढत आहेत. पेट्रोल ८०, तर डिझेलचा दर ७० रुपयांवर पोहोचला असून, त्यामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. राज्यात इंधनावर विविध कर लावले जात आहेत. पेट्रोल, डिझेलवर दुष्काळाच्या नावाखाली कर लावून ग्राहकांची लूट सुरू असल्याने, राज्य व केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेतला असल्याची माहिती.  महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस कमिटीच्या वतीनं देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)