नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेल दरवाढीचे चटके सहन करणाऱ्या सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीपासून जनतेची सुटका होईल, असे आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहे. इंधन दरवाढीपासून सर्वसामान्यांची लवकरच सुटका होऊ शकते. दरवाढ कमी करण्यासंबंधी केंद्र सरकारकडून कार्य सुरू आहे, असेही धर्मेंद्र प्रधान म्हणाले आहेत. पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणण्याचे संकेत यावेळी प्रधान यांनी दिले आहेत.

गेल्या 12 दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांमुळे जनतेचा रोष वाढत चालल्याचे पाहून मोदी सरकारही हादरले आहे. डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ मालवाहतूकदारांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे, तर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. हे तापलेले वातावरण पाहून, या परिस्थितीतून लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान दिलं आहे. त्यामुळे आता कोणता कर किती प्रमाणात कमी होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)