पिंपरी – दिवसें-दिवस वाढणा-या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (गुरुवारी) दोरी लावून गाडी ओढण्याचे अनोखे आंदोलन करण्यात आले.

सकाळी साडेदहा वाजता चिंचवड स्टेशन येथून पदयात्रेला सुरुवात झाली. शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, महिला अध्यक्षा व नगरसेविका वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विरोधी पक्षनेते दत्ता साने, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, निलेश पांढारकर, नगरसेविका सुलक्षणा धर, कविता खराडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे, युवकचे विशाल काळभोर, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते.

संजोग वाघेरे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर कमी होत असताना भाजपा प्रणित केंद्र सरकार मात्र, नागरिकांच्या माथी पेट्रोल, डिझेलची भाववाढ लादत आहे. यामुळे सर्वच क्षेत्रातील वाहतूकीचा खर्च वाढल्यामुळे बेसुमार भाववाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅस जीएसटी अंतर्गत घेतला पाहिजे. कच्चा तेलाच्या दरानुसार पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर कमी झाले पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली.

दररोज पेट्रोल, डिझेलचे दर वाढत आहेत. सरकार त्यावर नियंत्रण आणत नाही. या महागाईने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ पदयात्रा काढण्यात आल्याचे, विशाल वाकडकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)