पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत हवे – अनुराधा आदिक

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तहसीलदार सुभाष दळवींना निवेदन
श्रीरामपूर – केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात तत्काळ कपात करून इंधनाला वस्तू आणि सेवाकराच्या (जीएसटी) कक्षेत आणण्यात यावे. इंधनाचे वाढते दर आर्थिक समतोल बिघडवतील व त्यामुळे त्याचा विकासावर विपरीत परिणाम होत आहे. तरी शासनाने पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीबाबत फेरविचार करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी केली आहे.
तहसीलदार सुभाष दळवी यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बाजारात वाढलेल्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. पेट्रोलियम पदार्थांवरील अन्य राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रात सर्वाधिक विक्रीकर (व्हॅट) आणि दुष्काळ नसतानाही सेसच्या माध्यमातून जनतेकडून वसुली केली जात असल्याने राज्यात पेट्रोल व डिझेलचे दर सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण वर्षभरात पेट्रोल व डिझेलचे दर तब्बल 11 रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात महागाईने उच्चांक गाठला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर नगराध्यक्ष अनुराधा आदिक, तालुकाध्यक्ष कैलास बोरडे, शहराध्यक्ष लकी सेठी, महिला शहराध्यक्ष अर्चना पानसरे, तालुका युवक अध्यक्ष गणेश ठाणगे, शहर युवक अध्यक्ष योगेश जाधव, पंडित बोंबले, उत्तमराव पवार, रामभाऊ औताडे, भागचंद औताडे, सुभाष आदिक, सरवरअली सयय्द, उल्हास जगताप, प्रणिती चव्हाण, दीपक चव्हाण, बापूसाहेब पटारे, भाऊसाहेब भोईटे, भाऊसाहेब वाघ, हंसराज आदिक, भगवान आदिक, तुषार आदिक, आप्पासाहेब आदिक, अनिरुद्ध भिंगारवाला, गुरुचरण भटियानी, बाळासाहेब भोसले, नामदेव राऊत, किसनराव वमने, विजय खाजेकर, वाल्मिक जाधव, विलास गोराणे, सोहेल शेख, सुधाकर अडांगळे, औटी सर, वसंतराव पवार, मधुसूदन औताडे, डॉ. घोडे, पोपटराव आदिक, राजेंद्र विधाटे, रवी गरेला, अर्जुन आदिक यांच्या सह्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)