नवी दिल्ली: इंधन भडक्‍याचे सत्र मंगळवारीही कायम राहत लिटरमागे पेट्रोल आणि डिझेल आणखी 14 पैशांनी महागले. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 81 रूपयांच्या तर आर्थिक राजधानी मुंबईत 90 रूपयांच्या जवळ जाऊन ठेपला आहे. त्या शहरांमध्ये डिझेलचा दर अनुक्रमे 72.97 आणि 77.47 रूपये इतका झाला.
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या मुल्याची नीचांकी घसरण सुरूच असल्याने कच्च्या इंधनाच्या आयातीवरील खर्च वाढत आहे. परिणामी पेट्रोल आणि डिझेलचे दरही दररोज नवनवे उच्चांक करत आहेत. इंधन दरवाढीवरून मोदी सरकार चौफेर टीकेचे लक्ष्य बनले आहे. मात्र, दर कमी करण्यासाठी करकपातीचे पाऊल उचलण्याचा सरकारचा कुठलाही विचार नसल्याचेच संकेत मिळत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)