पेट्रोल-डिझेल आणखी चार रुपयांनी वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता आहे. जर सरकारी कंपन्यांना कर्नाटक निवडणुकीपूर्वीच्या मार्जिन स्थितीत पोहोचायचे असेल तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर चार रुपयांची वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले जात आहे. कर्नाटक निवडणुकीमुळे मागील तीन आठवड्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली नव्हती. त्यामुळे एकूण मार्जिनमध्ये मोठे अंतर निर्माण झाले होते. हाच तोटा भरुन काढण्यासाठी ही वाढ केली जाऊ शकते.

कर्नाटकमध्ये निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) आणि भारत पेट्रोलियम लिमिटेड (BPCL) या सरकारी तेल कंपन्यांनी 19 दिवासांनंतर सोमवारी पुन्हा दररोज दर बदलण्याच्या आधारावर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल करण्यास सुरुवात केली आहे. तेव्हापासून पेट्रोल 69 पैसे प्रति लिटर महाग झालं आहे, त्यामध्ये शुक्रवारी झालेली 22 पैशांच्या वाढीचाही समावेश आहे.

ऑईल मार्केटिंग कंपन्यांना येत्या आठवड्यात पेट्रोलच्या किरकोळ किमतीत प्रति लिटर साडेतीन ते चार रुपये आणि डिझेलच्या दरात चार ते साडेचार रुपयांची वाढ करण्याची गरज आहे. तेव्हाच त्या 2.7 रुपये प्रति लिटरची ग्रॉस मार्केटिंग मार्जिन मिळवू शकतील, असा दावा कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या एका अहवालात करण्यात आला आहे. या वाढीचा अंदाज डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर स्थिर राहण्याच्या अनुमानावर आधारित आहे, असंही अहवालात म्हटलं आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)