पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये 1 पैसा कपात

नवी दिल्ली – सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होत असल्याने वैतागलेल्या नागरिकांना बुधवारी छोटा दिलासा मिळाला. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आज चक्क 1 पैशाची दरकपात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 60 पैशाची कपात झाली, असे सकाळी जाहीर झाले होते. मात्र ही मानवी चूक होती. असे सरकारी कंपन्यांनी स्पष्ट केले आणि तासाभरातच कपात केवळ 1 पैशाची असल्याचे जाहीर करण्यात आले.

कर्नाटकच्या निवडणूकांच्या पार्श्‍वभुमीवर थांबवलेली पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 14 मे पासून सलग 16 दिवस वाढ होत होती. गेल्या पंधरवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये प्रति लीटर 3.8 रुपये वाढ करण्यात झाली आहे. सातत्याने झालेल्या या वाढीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्‍त होत असताना केवळ 1 पैसा दरकपात झाल्याने दिलासा मिळण्याऐवजी चेष्ठाच झाल्याची भावना व्यक्‍त होऊ लागली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)