पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा उच्चांकी वाढ

नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये रविवारी पुन्हा वाढ झाली. पेट्रोलच्या दरामध्ये लीटरमागे 12 पैसे आणि डिझेलच्या दरामध्ये लीटरमागे 10 पैशांनी वाढ झाली, असे इंधनाचा पुरवठा करणाऱ्या सरकारी कंपन्यांद्वारे सूचित करण्यात आले आहे. या दरवाढीमुळे दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 80.50 रुपये तर डिझेलचे दर प्रतिलीटर 72.61 रुपये इतक्‍या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.

इंधनाचे भाव कमी करण्यासाठी उत्पादन शुल्क कमी करण्यास सरकारची तयारी नाही. त्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांवरील बोजा वाढत चालला आहे, अशी टीका विरोधकांनी केली आहे. ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून पेट्रोलच्या दरामध्ये लीटरमागे 3.42 रुपये आणि डिझेलच्या दरामध्ये लीटरमागे 3.84 रुपयांची वाढ झाली आहे. रुपयाचे घसरलेले मूल्य आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूड तेलाच्या दरामध्ये वाढ झाल्याचा परिणाम म्हणून ही दरवाढ झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)