पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ सुरूच

नवी दिल्ली -विरोधकांनी पुकारलेल्या भारत बंदनंतरही इंधन दरवाढ काही थांबली नाही. आज पेट्रोलच्या दरात 14 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत आज एक लिटर पेट्रोलसाठी 88.26 रुपये मोजावे लागत आहेत. डिझेलच्या दरांमध्येही 15 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे डिझेलचा दर 77.47 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल परभणीत मिळत असून आज तेथील दर पेट्रोलचा दर ९०.५ व डिझेल ७८ रुपये प्रति लिटर आहे.

बंदच्या दिवशीही लिटरमागे पेट्रोल 23 पैशांनी तर डिझेल 22 पैशांनी महागले. त्यामुळे इंधन दरांनी नवनवे उच्चांक गाठण्याचे सत्र अबाधित राहिले.

ऑगस्टच्या मध्यापासून आतापर्यंत लिटरमागे पेट्रोलच्या दरात 3.65 रूपयांनी तर डिझेलच्या दरात 4.06 रूपयांनी वाढ झाली आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या मुल्याने नीचांकी पातळी गाठण्याचे सत्रही कायम असल्याने कच्च्या इंधनाच्या आयातीसाठी जादा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे इंधन दरवाढ होत आहे. दरम्यान, इंधन दरांच्या भडक्‍यापासून जनसामान्यांना दिलासा देण्यासाठी कर कमी करण्याची मागणी विरोधक करत आहेत. मात्र, करामध्ये कपात करण्याचा केंद्र सरकारचा कुठलाही विचार नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)