विरोधकांनी आज भारतबंदची हाक दिली असून देशभरात त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान भाजपाने विरोधकांच्या भारतबंद आंदोलनाबाबत आपली अधिकृत भूमिका मांडली आहे. भाजपानेते रविशंकर प्रसाद यांनी याबाबत एक पत्रकार परिषद घेऊन “इंधनाचे दर कमी करणे हे सरकारच्या हातात नसून, आंतरराष्ट्रीय स्थरावरील परिस्थितीला अनुरूप इंधनाचे दर कमी-अधिक होत असतात” असे वक्तव्य केले आहे.

“भाजपा सरकारमध्ये आल्यापासून महागाईचा दर कमी झाला आहे, तसेच मोदी सरकार सातत्याने सामान्य जनतेच्या हितासाठी अनेक लोकोपयोगी योजना राबवत आहे. या सगळ्यांसाठी लागणारा निधी हा सरकारी तिजोरीतूनच येत असतो, हे जनतेला देखील माहित असल्यानेच आजचा भारतबंद अयशस्वी झाला” असा दावा देखील प्रसाद यांनी यावेळी बोलताना केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)