पेट्रोल, डिझेलचा उडाला भडका…

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाची दरवाढ झाल्याने देशातील पेट्रोल, डिझेलचे दरही भडकले आहेत. मुंबईत पेट्रोलने लिटरमागे ८२ रुपये ५२ पैसे तर डिझलने लिटरमागे ७० रुपये २४ पैसे इतके पैसे मोजावे लागत आहेत. दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्यास केंद्रीय अर्थ खाते तयार नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना तुर्तास दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत.

इराण- अमेरिकेमधला अण्वस्त्रावरुन वाढता तणाव, व्हेनेझुएलातील अंतर्गत समस्या आणि मागणीत झालेली वाढ या कारणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव प्रति बॅरल ८० डॉलरपर्यंत (सुमारे ५ हजार ३१४ रुपये) पोहोचले आहेत. काही तज्ज्ञांनी तर कच्चा तेलाचे दर १०० डॉलरच्या घरात जाऊ शकेल, अशी भीती व्यक्त केली आहे. बुधवारी कच्चा तेलाच्या दराने नोव्हेंबर २०१४ नंतरचा उच्चांक गाठला आहे. याचे पडसाद भारतात उमटले आहेत. दिल्ली, मुंबईत पेट्रोल व डिझेलच्या दराने नवा उच्चांक गाठला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)