पेट्रोल आणि डीझेलपेक्षा ‘हे’ इंधन आहे अधिक स्वच्छ

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डीझेलपेक्षा सीएनजी अधिक स्वच्छ आणि सुरक्षित असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. भारतीय संशोधकांच्या एका ताज्या अभ्यासानुसार, हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

सीएनजी,  डीझेल आणि पेट्रोल यांच्या वापरानंतर होणाऱ्या उत्सर्जनाचा अभ्यास केल्यानंतर  इंडियन आयआयटी कानपूर येथील संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. यात विविध इंधनातून उत्सर्जन होणाऱ्या सूक्ष्म कणांचा मानवी पेशींवर काय परिणाम होतो याबद्दलही अभ्यास करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सीएनजी इंजिनातून उत्सर्जित कणांचा लोअर सरफेस एरिया हा डीझेल आणि पेट्रोल इंजिनाच्या तुलनेत कमी असतो, त्यामुळे शरीरात जाणारे विषारी घटकही कमी होतात. सीएनजीपासून निघणारे सूक्ष्म कण पीएचचे शोषण कमी करतात. डिझेल इंजिन आणि सीएनजी इंजिन यांच्यात तुलना करायची झाल्यास डीझेल इंजिनातून निघणारे कण सीएनजीपेक्षा ३० ते ५० पट अधिक असतात. त्यांच्यामुळे मानवी फुफ्फुसांचे नुकसान होते, असे संशोधकांच्या टीमने सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)