पेट्रोलियम कंपन्यांच्या शेअरचे भाव कोसळले 

इंधन दरकपात केल्यास नफा कमी होण्याची शक्‍यता 
मुंबई – इंधनाचे वाढलेले दर कमी करण्यासाठी सरकार तेल कंपन्यांना कर कमी न करता दर कपात करण्यास सांगू शकते असे बोलले जात आहे. त्यामुळे आज इंधन तयार करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरची जास्त विक्री होऊन मुख्य निर्देशांकही कमी झाले. त्याचबरोबर धातू कंपन्यांनाही कालच्या विक्रीचा फटका बसला. वेदांत कंपनीचे शेअर 6.23 टक्‍क्‍यांनी कमी झाले. काल या कंपनीच्या तमीळनाडूतील कारखान्याच्या अनषशंगाने मोठा हिंसाचार झाला आहे.
सकाळी निर्देशांक थोडे वाढले होते. मात्र नंतर विक्री वाढल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला नाही. बुधवारी झालेल्या विक्रीमुळे मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल 306 अंकांनी कोसळून 34344 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 106 अंकानी कमी होऊन 10430 अंकांवर बंद झाला.

रुपयाचे मूल्य वेगाने कमी होत आहे. त्याबरोबर बऱ्याच कंपन्यांनी सुमार ताळेबंद जाहीर केले आहेत. देशातील या कारणामुळे शेअरबाजारात विक्रीचे वातावरण होते. तर उत्तर कोरियाच्या नेत्यांवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टीका केल्यामुळे जागतिक वातावरणही अनुकूल नव्हते. ट्रम्प यांनी पुन्हा चीनच्या व्यापार पद्धतीवर जोरदार टीका केली आहे. आता निर्देशांक एक महिन्याच्या नीचांकी पातळीवर गेले आहेत. जागतिक पातळीवर परिस्थिती खराब असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून गुंतवणूक काढून घेणे चालूच आहे. काल या गुंतवणूकदारांनी तब्बल 1651 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. मात्र, काल देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 1496 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केल्यामुळे काल निर्देशांकाची मर्यादित प्रमाणात हानी झाली.

जागतिक बाजारातूनही आज सकारात्मक संदेश आले नाहीत. त्यामुळे निर्देशांक घसरत गेल्याचे ब्रोकर्सनी सांगितले. स्टेट बॅंकेने काल मोठा तोटा झालेला ताळेबंद जाहीर केल्यानंतर काल या बॅंकेच्या शेअरच्या भावात वाढ झाली होती.
आजही या बॅंकेच्या शेअरच्या भावात वाढ झाली. आता या बॅंकेचा अनुत्पादक मालमत्तेचा प्रश्‍न हळूहळू कमी होईल असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. आज झालेल्या विक्रीमुळे धातू, तेल आणि नैसर्गिक वायू, रिऍल्टी, पायाभूत सुविधा, सार्वजनिक क्षेत्र, ग्राहक वस्तू, वाहन, आरोग्य, बॅंकिंग, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे निर्देशांक 3.93 टक्‍क्‍यापर्यंत कमी झाले.

बहुतांश बॅंकांनी तोट्याचे ताळेबंद जाहीर केले असले तरी आता बॅंकांची अनुत्पादक मालमत्ता धोक्‍याच्या पातळीच्या खाली जाण्याची शक्‍यता वाढली आहे. त्यामुळे बॅंकांच्या शेअरची गुंतवणूकदारांकडून निवडक खरेदी चालू आहे. मात्र, भडकलेले क्रूड गुंतवणूकदारांच्या चितेंचा विषय आहे.
विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजी वित्तीय सेवा 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)