पेट्रोलपंपावर दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांना अटक

सातारा – हवेत गोळीबार करुन पेट्रोल पंपावर दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. 6 सशस्त्र दरोडेखोरांनी पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करीत 25 हजाराची रोकड लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, रक्कम घेवून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या या दरोडेखोरांचा पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. वडगाव हवेली येथे शनिवारी पहाटे ही घटना घडली.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कराड-तासगाव मार्गावर वडगाव हवेली गावच्या हद्दीत पेट्रोल पंप आहे. शुक्रवारी रात्री तेथील कर्मचारी पंप बंद करुन झोपले असताना पहाटेच्या सुमारास सहा दरोडेखोर दुचाकींवरुन तेथे आले. त्यांनी हवेत गोळीबार करीत कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या हल्ल्याने कर्मचारी घाबरले. त्यांनी ड्राव्हरमधील 25 हजाराची रोकड काढून दरोडेखोराना दिली. त्यानंतर दरोडेखोरांनी तासगावच्या दिशेने पळ काढला. दरम्यान, पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिस ठाण्यातून वायरलेस यंत्रणेवरुन ही माहिती गस्तीवरील पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिस पथकाने सिनेस्टाईलने दरोडेखोरांचा पाठलाग केला आणि टोळीला पकडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)