पेट्रोलचे भाव 78 रुपये प्रति लीटर…

नवी दिल्ली – पेट्रोलच्या दरामध्ये 14 पैसे आणि डिझेलच्या दरामध्ये लीटरमागे 15 पैशांनी वाढ झाली. त्यामुळे पेट्रोलचे दर  दिल्लीमध्ये प्रति लीटर 78 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले. गेल्या अडीच महिन्यांमध्ये पहिल्यांदाच पेट्रोलच्या दरात एवढी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे डिझेलचे भावही वाढत आहेत.

यापूर्वी 3 जून रोजी पेट्रोलचे भाव 78 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचले होते. आता दिल्लीमध्ये 78.05 रुपये तर मुंबईमध्ये प्रति लीटर 85.47 रुपये असा पेट्रोलचा भाव झाला आहे. तर डिझेलेचे नवीन भाव दिल्लीमध्ये प्रति लीटर 69.61 रुपये आणि मुंबईमध्ये 73.90 रुपये इतके झाले आहेत.

याच वर्षी 29 मे रोजी डिझेलच्या किंमती 69.31 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचल्या होत्या. डिझेलच्या दरांनी कालच ही सर्वोच्च मर्यादाही ओलांडली होती. 29 मे रोजी पेट्रोलचे दर दिल्लीमध्ये 78.43 रुपये आणि मुंबईत 86.24 रुपये इतके जास्ती होते. त्या तुलनेत पेट्रोलचे आजचे दर कमी आहेत. 16 ऑगस्त रोजी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्यापासून इंधनाची दरवाढ व्हायला सुरुवात झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)