इंधन दर वाढले नाहीत; कमी झाले, दरवाढीबाबत भाजपचे ‘अजब’ गणित!

देशभरामध्ये आज काँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात भारतबंदचे आंदोलन पुकारले असून अनेक प्रादेशिक पक्षांकडून भारतबंद आंदोलनाला पाठिंबा मिळाला आहे. दरम्यान भाजपाने काँग्रेसने इंधन दरवाढीबाबत छेडलेले आंदोलन कशा प्रकारे ‘बोगस’ आहे हे दाखवण्यासाठी एक नामी शक्कल लढवली आहे. भाजपाच्या अधिकृत ट्विटर अकाउंट द्वारे ‘इंधन दरवाढीचे सत्य’ अशा मथळ्याखाली एक ग्राफ शेअर करण्यात आला असून याद्वारे भाजपा आपल्या कार्यकाळात वाढलेले इंधनाचे दर ‘काँग्रेस’च्या काळात वाढलेल्या दरांच्या तुलनेत कशा प्रकारे कमी आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे.

भाजपाने सादर केलेल्या ‘ग्राफ’नुसार काँग्रेसच्या कार्यकाळात, मे २००९ ते मे २०१४ या काळात इंधनाचे दर ४०.६२ रुपयांवरून ७५.८% टक्क्यांनी वाढून ७१.४१ रुपयांवर पोहोचल्याचे दाखवले आहे. तर याउलट भाजपाच्या कार्यकाळात मात्र ही वाढ केवळ १३% टक्क्यांची म्हणजेच ७१.४१ रुपयांवरून ८०.७३ (मे २०१४ ते सप्टेंबर २०१८) रुपयांपर्यंत असल्याचे ‘हा’ ग्राफ दाखवतो. याद्वारे भाजपाने इंधनाच्या दरवाढीमध्ये आपल्या कार्यकाळात झालेली वाढ ही काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या इंधन दरवाढीच्या तुलनेत कमी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरी काँग्रेस-भाजपाच्या वादात सामान्य माणसाचे मात्र हाल होत असल्याचे चित्र आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)