पॅलेस्टाईन निर्वासितांसाठी सर्वच देशांनी मदत वाढवावी 

भारताचे संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांना आवाहन 

संयुक्तराष्ट्रे: संयुक्तराष्ट्रांकडे सध्या निधीची मोठी चणचण आहे. त्यामुळे पॅलेस्टाईन निर्वासितांना मदत करण्यात मर्यादा येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सदस्य देशांनी आपल्या देणगीचे प्रमाण वाढवावे असे आवाहन भारताने केले आहे. पॅलेस्टाईन निर्वासितांच्या मदतीसाठी काम करणाऱ्या संयुक्तराष्ट्रांच्या मदत समितीने म्हटले आहे की आम्हाला सुमारे 54 लाख पॅलेस्टाईन निर्वासितांच्या मदतीचे व पुनर्रवसनाचे काम करावे लागते त्यासाठी आम्हाला मोठ्या प्रमाणात मदतीची गरज आहे. भारताचे संयुक्तराष्ट्रातील सेक्रेटरी महेशकुमार यांनी आज येथे सांगितले की या कामासाठी मिळणाऱ्या मदतीचे बरेचसे स्वरूप ऐच्छिक आहे. त्यामुळे त्यातून उपलब्ध होणारा निधी अत्यंत तोकडा आहे. या निर्वासितांसाठी शिक्षण, आरोग्य, अशा मुलभूत सुविधा पुरवण्यातही सध्या निधीच्या कमतरतेमुळे अडचण येत आहे त्यामुळे हा निधी वाढवण्यासाठी सदस्य देशांनी मदत करणे सध्या गरजेचे बनले आहे.

-Ads-

सध्या या कामासाठी सुमारे 400 दशलक्ष डॉलर्स इतका निधी देणग्यांमधून उपलब्ध होत असतो पण प्रत्यक्षात अजून यासाठी 450 दशलक्ष डॉलर्सची गरज आहे. ही मदत कशी आणि कोठून मिळवायची हा सध्याचा मोठा प्रश्‍न आहे असे कुमार म्हणाले. अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने या कामासाठी अमेरिकेकडून आता अतिरीक्त निधी मिळणार नाही असे या आधीच स्पष्ट केले आहे त्यामुळे या कामापुढील अडचणी वाढल्या आहेत असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे. पॅलेस्टाईन मधील नागरीकांच्या मदतीसाठी भारताने गेल्या पाच वर्षात सुमारे 17 करार करून त्यांना कृषी, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, महिला सक्षमीकरण इत्यादी क्षेत्रात मोलाची मदत केल्याची माहितीही कुमार यांनी दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)