पॅलेस्टाईन निर्वासितांसाठी भारताची मदत

संयुक्तराष्ट्रे – मध्यपुर्वेतील पॅलेस्टाईन निर्वासितांसाठी 20 राष्ट्रांनी 100 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मदत देण्याची घोषणा केली असून त्यामध्ये भारताचाही समावेश आहे. 15 मार्च मध्ये रोम मध्ये झालेल्या मंत्रिस्तरीय बैठकीत हा निधी उभारण्याची घोषणा करण्यात आली. त्यात योगदान देण्याची ग्वाही कतार, नॉर्वे, तुर्की, कॅनडा, भारत, स्वीत्झर्लंड या देशांनीही दिली आहे. त्यात भारताने 5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स देण्याची घोषणा केली आहे.

मध्यपुर्वेत विविध भागात सध्या सुमारे पन्नास लाख पॅलेस्टाईन निर्वासित राहात आहेत. त्यांना मदत करण्याची गरज असून ही गरज ओळखून त्यांना ही मदत करण्याची घोषणा करण्यात आली आहे. केवळ विविध देशांनी सरकारी पातळीवरच नव्हे तर जगातील खासगी उद्योग समुहांनीही यासाठी मदत करावी असे आवाहन संयुक्तराष्ट्रांनी केले आहे. संयुक्तराष्ट्रांतर्फे या प्रदेशात स्थैर्य आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी कसोशिचे प्रयत्न केले जातील असेही आवाहन करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)