पॅराडाईज… दुसऱ्या महायुद्धाचं वास्तव चित्रण

अमोल कचरे

रशिया, जर्मनी, पोलंड या देशांमधील जे चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये दाखल होतात, त्यामध्ये दुसऱ्या महायुद्धाशी निगडित सिनेमे असतातच. मुळातच दुसऱ्या महायुद्धाचा या देशांवर खूप दूरगामी परिणाम झाले. त्या पार्श्वभूमीवरील पॅराडाईज (रशिया/जर्मनी) हा चित्रपट यंदा पिफ मध्ये ग्लोबल सिनेमा या विभागात दाखवण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्युईश लोकांवर खूप मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले. त्या दरम्यान नरसंहारही खूप मोठ्या प्रमाणात झाला. हिटलरने सुरु केलेले गॅस चेंबर तर नरसंहारासाठी प्रसिद्ध होते. तीन मुख्य कॅरेक्‍टर्सच्या आयुष्यात या दरम्यान घडलेल्या घटना या चित्रपटात मांडण्यात आल्या आहेत. रशियाची ओल्गा, फ्रेंच कोलॅब्रेटर ज्यूल्स आणि हाय रॅंकिंग एसएस ऑफिसर हेल्मट. ओल्गाला दोन लहान ज्युईश मुलांना पळून जाण्यात मदत केल्याबद्दल पकडलेले असते. तिची चौकशी करण्याची जबाबदारी ऑफिसर ज्यूल्स कडे असते.

एकीकड़े जर्मनी या युद्धात पराभवाच्या मार्गावर असतं, त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर या तिघांच्याही आयुष्यात जे काही घडतं, ते चित्रपटात मंडळ गेलंय. या पैकी हेल्मट आणि ओल्गा हे याआधीही एकमेकांच्या आयुष्यात आले होते. पण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. आता संपूर्ण वेगळ्या परिस्थितीत हे दोघेही एकमेकांना भेटतात. हेल्मटचं ओल्गा वर प्रेम आहे, त्या प्रेमापोटी हेल्मट ओल्गाला जर्मन कॅम्प मधून पळून जाण्यासाठी मदतसुद्धा करतो, पण अगदी शेवटच्या क्षणी ओल्गा तिचा निर्णय बदलते. या तिन्ही पात्रांच्या जगण्याविषयी ज्या अपेक्षा असतात, त्या सरते शेवटी परिस्थितीमुळे पूर्ण होत नाहीत.
या तीनही मुख्य कॅरेक्‍टर्सच्या आत्मा त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना आपल्याला सांगत असतात, ही संकल्पनाच वेगळी असल्यामुळे हा चित्रपट उल्लेखनीय झालाय.

दिग्दर्शक आंद्रेई कोंचलोवस्की यांनी चित्रपटाची मांडणी करताना त्या काळातील वास्तव चित्रण करण्याचा प्रयत्न केलाय. हा चित्रपट पाहताना स्टिव्हन स्पीलबर्ग यांची दुसऱ्या महायुध्दावरील मास्टरपीस कलाकृती ‘शिंडलर्स लिस्ट’ या चित्रपटाची आठवण होते. ज्यू लोकांवर दुसऱ्या महायुद्धात करण्यात आलेल्या अत्याचाराचं वास्तव चित्रण या चित्रपटात करण्यात आलं होतं. पॅराडाईज आणि ‘शिंडलर्स लिस्ट’ या दोन्ही चित्रपटांमध्ये एक प्रमुख साम्य आहे ते म्हणजे दोन्ही सिनेमांना ब्लॅक अँड व्हाईट ट्रीटमेंट दिली गेलीये. यंदाच्या पिफ मध्ये ग्लोबल सिनेमा विभागात ‘मस्ट वॉच’ अशी ही फिल्म आहे. शुक्रवारी रात्री राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय इथं हा चित्रपट दाखवण्यात आला. या फिल्मचं पुनर्प्रक्षेपण सोमवारी 15 जानेवारी रोजी सिटीप्राईड कोथरूड इथं स्क्रीन-2 मध्ये संध्याकाळी 5 वाजता आहे.

कुंदन शहा : कभी हा कभी ना…
आज दुपारी 4 वाजता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय इथं प्रसिद्ध दिग्दर्शक कुंदन शहा यांची गाजलेली फिल्म कभी हा कभी ना दाखवण्यात येणार आहे. गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात कुंदन शहा यांचं निधन झालं होतं. त्यांना श्रद्धांजली म्हणून हा चित्रपट पिफ मध्ये दाखवण्यात येतोय. कुंदन शहा त्यासारख्या विनोदी सिनेमांसाठी हिंदी चित्रपट सृष्टीत प्रसिद्ध आहेत.

आज पिफ मध्ये

वर्ल्ड कॉंपिटिशन :
मोअर (टर्की)
सिटीप्राईड कोथरूड स्क्रीन 2 – सकाळी 9.15 वाजता


फ्री अँड इझी (चीन)
सिटीप्राईड कोथरूड स्क्रीन 2 – दुपारी 12 वाजता

द नथिंग फॅक्‍टरी (पोर्तुगाल)
सिटीप्राईड कोथरूड स्क्रीन 1 – दुपारी 4.30 वाजता.


मराठी कॉंपिटिशन
म्होरक्‍या (दिग्दर्शक : अमर देवकर )
सिटीप्राईड कोथरूड स्क्रीन 1- सकाळी 10.45 वाजता


नशीबवान (दिग्दर्शक : अमोल गोळे )
सिटीप्राईड कोथरूड स्क्रीन 1- दुपारी 1.45 वाजता


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)