पॅनिक बटण सक्‍तीमुळे मनस्ताप

पुणे – नववर्षापासून प्रवासी संवर्गातील (टुरीस्ट) वाहनांना व्हेईकल ट्रॅकींग डिव्हाइस आणि पॅनिक बटण बसविणे सक्‍तीचे करण्यात आले आहे. या उपकरणांशिवाय नव्या वाहनांची नोंदणी थांबवण्यात आली आहे. मात्र, सद्यस्थितीत ही यंत्रणा बाजारात उपलब्ध होत नसल्याने याचा त्रास वाहनचालकांना होत असून पुणे कार्यालयातील जवळपास हजार वाहने नोंदणीसाठी रखडली आहेत.

केंद्र सरकारच्या नव्या निर्णयानुसार व्हेईकल ट्रॅकींग डिव्हाईस आणि पॅनिक बटण या उपकरणाची सक्‍ती करण्यात आली. मात्र, याची निर्मिती व विक्री करणाऱ्या मान्यताप्राप्त कंपन्यांची माहिती उपलब्ध नाही. हे उपकरण वाहनात बसविल्यानंतर त्याचे कार्य, वापर व उपयोग कशा पद्धतीने होणार याबाबत स्पष्टता नाही. यामुळे या निर्णयाला शासनाकडून मुदतवाढ मिळण्यासाठी पाठपुरावा करावा व 31 डिसेंबर 2018 पूर्वी विक्री व तात्पुरती नोंदणी झालेल्या वाहनांची पक्‍की नोंदणी करावी. अशी मागणी शहरातील वाहतूक संघटनांनी आरटीओ कार्यालयाकडे केली आहे. याचा विचार करत आरटीओ कार्यालयाकडून याविषयीची माहिती पुढे राज्य परिवहन कार्यालयाला पाठवण्यात आली. यामुळे आता परिवहन कार्यालय पुढील निर्णय घेणार आहे. मात्र, सद्यस्थितीत अनेक नवी वाहने निर्णयाच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती मोटार वाहन चालक मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काय आहे पॅनिक बटण
प्रवासी वाहनांमधून प्रवास करताना एखाद्या प्रवाशास विशेषतः महिला प्रवाशास काही धोका वाटल्यास प्रवासी त्या वाहनातील पॅनिक बटणचा वापर करु शकतो. जीपीएस यंत्रणेच्या माध्यमातून हे बटण थेट राज्याच्या पोलीस कंट्रोल रुमला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे धोकादायक परिस्थितीमध्ये असणारा प्रवासी कोठे आहे, कोणत्या गाडीत आहे, याची माहिती पोलिसांना उपलब्ध होणार आहे.

परिवहन कार्यालय घेणार निर्णय
पॅनिक बटणाअभावी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) नव्या वाहनांचे पासिंग थांबविण्यात आले आहे. याबाबत वाहतूक संघटनांनी शनिवारी आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करून आरटीओच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. यानंतर संबंधित बाब लक्षात घेऊन आरटीओ कार्यालयाने परिवहन आयुक्‍त कार्यालयाला याबाबतची माहिती दिली असून पुढील निर्णय परिवहन आयुक्‍त कार्यालय घेणार आहे. त्यामुळे शहरातील पासिंग रखडलेले तब्बल एक हजार वाहतूकदार परिवहन कार्यालयाच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)