‘पॅन’ला ‘आधार’ जोडण्यास 30 जूनपर्यंत मुदत

प्रत्यक्ष करांच्या केंद्रीय मंडळाचा निर्णय

नवी दिल्ली- प्राप्तीकर विवरणांना ‘आधार’ क्रमांक आणि ‘पॅन’ जोडण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय आज केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने घेतला. प्राप्तीकर विवरणांशिवाय अन्य सेवांसाठी ‘आधार’ क्रमांक जोडण्याची मुदत 31 मार्च रोजी संपणार होती. ‘पॅन’ आणि ‘आधार’ क्रमांक जोडण्यास देण्यात आलेली ही मुदतवाढ सरकारकडून चौथ्यावेळेस देण्यात आलेली मुदतवाढ आहे. आता प्राप्तीकर विवरण दाखल करण्यासाठी ‘आधार’ क्रमांक जोडणे सरकारने अनिवार्य केले आहे.

1 जुलै 2017 रोजी ‘पॅन’ क्रमांक अस्तित्वात असलेल्या आणि ‘आधार’साठी पात्र असलेल्या व्यक्‍तीला आपला ‘आधार’ क्रमांक कर विभागाकडे नोंदवावाच लागेल, असे प्राप्तीकर कायद्यातच नमूद करण्यात आले आहे. यावर्षी 5 मार्च पर्यंत 33 कोटी ‘पॅन’धारकांपैकी 16.65 कोटी जणांनी ‘आधार’ क्रमांक जोडलेला आहे.

कल्याणकारी योजनांसाठी मात्र मुदतवाढ नाही
‘पॅन’ क्रमांकाला ‘आधार’ जोडण्यासंदर्भातील मुदत वाढवण्यात यावी, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापिठाने दिली होती. ‘आधार’मध्ये बायोमेट्रीक डाटाच्या वापरण्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने नुकतेच हे निर्देश दिले होते. त्यानुसार ही मुदतवाढ दिली गेली आहे. मात्र आता कल्याणकारी योजनांसाठी ‘आधार’ क्रमांक जोडण्यासाठी 31 मार्चपेक्षा अधिक मुदत दिली जाणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. मात्र “आधार’च्या माध्यमातून अनुदानांचे थेट लाभ हस्तांतरण करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सरकारला परवानगी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)