“पॅनकार्ड क्‍लब’ छोट्या गुंतवणुकदारांना परतावा?

“सेबी’चे मुख्य वसुली अधिकारी डी. व्ही. शेखर यांची माहिती

पुणे – पॅनकार्ड कल्ब कंपनीच्या गुंतवणुकदारांची माहिती तपासणी “सेबी’ अर्थात सिक्‍युरिटी एक्‍सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने पूर्ण केली आहे. देशभरातील सुमारे 51 लाख नागरिकांची यामध्ये फसवणूक झालेली आहे. यातील 25 लाख हे छोटे गुंतवणूकदार आहेत. त्यामुळे सुरूवातीच्या लिलाव प्रक्रियेतून फक्‍त 300 कोटी मिळाले, तरी त्यातून 25 लाख गुंतवणूकदारांचा परतावा मिळू शकतो, अशी माहिती सेबीचे मुख्य वसुली अधिकारी डी. व्ही. शेखर यांनी दिली.

“सेबी’ने पॅनकार्ड क्‍लब कंपनीच्या 24 मिळकतींच्या ऑनलाइन लिलाव प्रकियेची सुरूवात केली आहे. त्यामध्ये या मिळकतींच्या किंमती 60 ते 70 टक्‍क्‍यांनी कमी करण्यात आल्याने गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबई येथे राष्ट्रशक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाने सेबीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी शेखर यांनी ही माहिती दिली.

याविषयी राष्ट्रशक्ती संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर दारवटकर यांनी सांगितले, पॅनकार्ड क्‍लब कंपनीच्या संचालकांनी प्रतिज्ञापत्रावर कंपनीच्या मिळकतींच्या किंमती फुगवून सांगितल्या आहेत. त्याप्रमाणे लिलाव करण्यात आला. सुरूवातीला या मिळकतींच्या लिलावास ग्राहक मिळाले नाही. मात्र, आता शासनाच्या एसबीआय कॅपिटलमार्फत मिळकतींचे मूल्यांकन करण्यात आले आहे. लिलावप्रक्रियेत तेच आधारभूत धरण्यात आल्याचे “सेबी’च्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणले. लिलावातून सेबीकडे 50 ते 60 कोटी रुपये सुरूवातील जमा झाले, तरी जून-जूलै 2018 पासून गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा देणे सुरू करण्याचे आश्‍वासन “सेबी’ने दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)