पॅनकार्ड क्‍लब्ज गुंतवणूकदारांचे परतावे मिळण्यासाठी धरणे आंदोलन

नगर – पॅनकार्ड क्‍लब्ज कंपनीत अडकलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे (परतावा) मिळण्यासाठी महात्मा गांधींच्या स्मृतिदिनी राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को-ऑर्डिनेशन कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. प्रारंभी महात्मा गांधींच्या प्रतिमेस अभिवादन करून आंदोलन करण्यात आले. यावेळी कमिटीचे जिल्हाध्यक्ष देवराम कार्ले, उपाध्यक्ष भाऊसाहेब घुंगार्डे, मच्छिंद्र चौरे, नानासाहेब गाडगे, साहेबराव तांबोळी, दीपक फलके, मच्छिंद्र चौरे, आर. एम. आकुबत्तीन, अशोक शिदोरे, नानासाहेब गाडगे, दिलीप जपकर, साहेबराव सुंबे, गजानन नरसाळे, आदींसह गुंतवणूकदार सहभागी झाले होते.

महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या राज्यात एकाच वेळी एकदिवसीय राज्यस्तरीय धरणे आंदोलन करण्यात आले असून, सेबी आणि केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. पॅनकार्ड क्‍लब्ज कंपनीच्या माध्यमातून 55 लाख गुंतवणूकदारांचे पैसे अडकले आहे. महाराष्ट्रातील तीस ते पस्तीस लाख सामान्य गुंतवणूकदारांचे परताव्याचे भवितव्य टांगणीला लागले असून, अद्यापि केंद्र सरकारकडून याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. पॅनकार्ड क्‍लब्ज कंपनीतील गुंतवणूकदारांचे परतावे परत मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)