“पॅटर्न लॉक’ सांगण्यास नकार ; तरुणीला मारहाण

पिंपरी – मोबाईल पॅटर्न लॉक सांगितला नाही म्हणून 19 वर्षीय तरुणीला कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 24) रोजी सकाळी दहा वाजता चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयाजवळ घडली.

वरुषा विजय शेफर्ड (वय-19, रा. म्हाडा कॉलनी, पिंपरी) असे फिर्यादी मुलीचे नाव आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात संभाजी गुलाब शेलार (वय-30, रा. सोमाटणे फाटा, तळेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने वरुषा हिला जबरदस्तीने त्याच्या गाडीत बसविले. तिला तिच्या मोबाईलचा पॅटर्न लॉक विचारला. तो न दिल्याने त्याने कमरेच्या पट्ट्याने तिच्या तोंडावर, हातावर मारुन जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
2 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)