पॅगोडा लोकार्पण खा. शरद पवार यांच्या हस्ते

कमल तुळशीराम शिलवंत यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त समारंभाचे आयोजन

कराड – अशोक सर्वांगिण विकास सोसायटी पुणे तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पॅगोडा लोकार्पण सोहळ्याचे उद्‌घाटन लोकनेते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच कमल शिलवंत यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त कमलआई पुरस्कार वितरण समारंभही आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने लोकनेते शरदचंद्र पवार यांना अशोकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच विक्रमसिंह पाटणकर यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती अशोक सर्वांगिण विकास सोसायटीचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ. अशोक शिलवंत यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस अमोल माने, माजी सरपंच दयानंद शिलवंत, पाटण तालुका दूध विकास संघाचे संचालक विकास शिलवंत, पाटण तालुक्‍याचे खरेदी विक्री संघाचे हनुमंत माने, बजरंग मोरे, सुरेश नलवडे आदी मान्यवर उपस्थित होते. सोमवार दि. 24 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वा. ठोमसे ता. पाटण येथून भगवान बुद्धांच्या अस्थी(धातू) बौद्धरूप सम्राट अशोकांची मुर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची हत्तीवरून मिरवणूक निघणार आहे. दि. 25 रोजी दुपारी 1 वा. ठोमसे येथील राजप्रिया अशोकवन शक्ती स्थळ येथे नवनिर्मित पॅगोडा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.

यावेळी माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक मंत्री राजकुमार बडोले, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी रस्ते विकास मंत्री महा.राज्य विक्रमसिंह पाटणकर, साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, मुख्यसंयोजक कल्पना शिलवंत, सुलोचना शिलवंत, राजरत्न शिलवंत, प्रकाश बालवडकर आणि कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष विद्याभूषण डॉ. प्रशांत पगारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत असेही डॉ. शिलवंत यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)