पृथ्वी शॉ -शुबमान गिल दोघेही भारतीय क्रिकेटचे भविष्यातील सुपरस्टार-ऋषी कपूर

मुंबई :  आपल्या ट्वीटमुळे नेहमी वाद ओढवून घेणारे प्रसिद्ध असणारे अभिनेते ऋषी कपूर यांनी भारतीय अंडर-19 संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ आणि शुबमान गिल यांचे चांगलेच कौतुक केले आहे. हे दोघेही खेळाडू भारतीय क्रिकेटचे भविष्यातील सुपरस्टार आहेत, असे ट्वीट त्यांनी केले आहे.
अंडर-19 विश्वचषकात भारतीय संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ आणि फलंदाज शुबमान गिल यांनी दमदार कामगिरी केली आहे. सेमीफायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध शुबमान गिलने नाबाद शतकी खेळी करत मोलाची कामगिरी केली. या विश्वचषकातील आतापर्यंतच्या प्रत्येक सामन्यात शुबमान गिलने दमदार फलंदाजी केली आहे.
सलामीवर फलंदाज पृथ्वी शॉनेही प्रत्येक सामन्यात भारताला चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला येणाऱ्या शुबमान गिलने खंबीरपणे भारतीय डाव सांभाळला. भारताच्या या युवा फलंदाजांच्या खेळीतील सातत्यानेच भारतीय संघाने सेमीफायनलपर्यंत धडक मारली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)