पृथ्वी शॉ दुसऱ्या कसोटीला ही मुकणार

पर्थ: दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत संघाबाहेर राहिलेला सलामीवीर पृथ्वी शॉ दुसऱ्या कसोटीलाही मुकणार आहे. दुखापतीतून पृथ्वी अद्याप पर्यंत पूर्णपणे सावरला नसल्यामुळे त्याला या क्‍सोटीतही विश्रांती दिली गेली आहे. पर्थ कसोटीपूर्वी पृथ्वीने धावण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे दुसऱ्या कसोटीत तो खेळण्याची शक्‍यता बळावली होती.

मात्र, दुसऱ्या कसोटीसाठी 13 सदस्यांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये पृथ्वी शॉची निवड झालेली नाही.

सराव सामन्यावेळी झेल घेताना पृथ्वी शॉ जखमी झाला होता. पायाला दुखापत झाल्यामुळे पहिल्या कसोटीला पृथ्वी मुकला होता. दुखापत अद्याप पूर्णपणे बरी न झाल्यामुळे दुसऱ्या कसोटीतूनही त्याला विश्रांती देण्यात आली आहे. पृथ्वीच्या अनुपस्थितीत पहिल्या कसोटीत लोकेश राहुल आणि मुरली विजयने भारताच्या डावाची सुरूवात केली होती. आता पुन्हा एकदा ही जोडी पर्थवर डावाची सुरूवात करतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)