पृथ्वी शॉ आणि जडेजा उत्तम खेळाडू – विराट कोहली

राजकोट: भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दरम्यान सुरु असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी विजय संपादन करत भारताने इंग्लंड दौऱ्यातील अपयश बाजुला सारले असून विंडीज वरिल विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने आपल्या भावना व्यक्त करताना सलामीवीर पृथ्वी शॉ आणि अष्टपैलु खेळाडू रवींद्र जडेजायांची स्तुती करताना हे दोन खेळाडू म्हणजे उत्तम दर्जाचे खेळाडू असून कोणत्याही क्षणी सामना फिरवीण्याची ताकत या खेळाडूंमध्ये आहे असे प्रशंसोद्गार त्याने यावेळी काढले.

आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या पृथ्वी शॉ बद्दल बोलताना कोहली म्हणाला की, शॉहा एक उत्तम दर्जाचा खेळाडू आहे त्यामुळे त्याला कसोटी संघात स्थान दिले होते. त्याने आपल्याला मिळालेल्या या संधीचे सोने करताना आपल्या पहिल्याच खेळीत शतक साजरे करताना आपला नैसर्गीक खेळ दाखवला त्यामुळे संघाला विजय मिळवता आला. तसेच त्याने आपल्यातील गुणवत्ताही सर्वांना दाखवून दिली आहे.

-Ads-

पृथ्वीने ज्या पद्धतीने खेळ केला आहे तो पाहून मी खूप आनंदी आहे. पहिलाच सामना खेळत असताना त्याने विंडिजच्या गोलंदाजांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. त्याच्या या खेळीमुळे मी प्रभावीत झालोय, आपल्यात एक वेगळं कौशल्य असल्याचं त्याने दाखवून दिलं आहे. विराट पृथ्वीच्या खेळाची स्तुती करत होता. पृथ्वी शॉ, विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा यांनी झळकावलेल्या शतकांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 9 गड्यांच्या मोबदल्यात 649 धावांपर्यंत मजल मारली होती.
तर रवींद्र जडेजाने तर आधीही संघासाठी धावा केल्या आहेत. त्याला शतक साजरे करताना पाहू इच्छित होतो. जडेजामध्ये तर सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता आहे. जडेजाने या सामन्यात आपले पहिले शतक झळकावतानाच अष्टपैलू कामगिरीतून संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला. असेही त्याने यावेळी सांगितले.

प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणण्याचे श्रेय कोहलीने मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांना दिले. तो म्हणाला, “शमी आणि उमेश यांनी वेगवान माऱ्यामुळे पाहुण्यांना सुरुवातीला अडचणीत आणले. तसेच उभय संघांची तुलनाच होऊ शकत नाही. विंडीजचा सध्याचा संघ थोडा कमकुवत आहे. आम्ही स्वत:च्या क्षमतेनुसार खेळून वर्चस्व गाजविल्याचे कोहलीने सांगितले. तसेच इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत पत्कराव्या लागलेल्या पराभवानंतर भारताने मायदेशात पहिला कसोटी सामना खेळताना दमदार पुनरागमन केलं आहे. इंग्लंडमधून परतल्यानंतर परिस्थितीशी जुळवून खेळ करणं हे संघासमोरचं मोठं आव्हान होतं हे देखील विराटने मान्य केलं आहे.

तर, यावेळी बोलताना पृथ्वी म्हणाला, कसोटी कारकिर्दीची सुरुवात शानदार झाली आहे. हा विजयदेखील प्रेक्षणीय ठरला असून कसोटी पदार्पणात धावा काढल्यानंतर संघाला विजय मिळवून दिल्यामुळे आनंद झाला आहे. आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचे नेहमी आव्हान असतेच पण मी नैसर्गिक खेळ करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे माज्या वरिल सर्व दडपण दूर झाले आणि मी पहिल्याच सामन्यात शतकी खेळी साकारू शकलो.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)