पृथ्वी शॉने कोणतेही दडपण न घेता फलंदाजी करावी – अजिंक्‍य रहाणे

भारतीय संघात निवड झाल्यानंतर महत्वाची प्रतिक्रीया

राजकोट: भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान येत्या गुरुवार पासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिके मधून भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉने पदार्पणाचे कोणतेही दडपण न घेता ज्या प्रमाणे मुंबईकडून रणजी मध्ये फलंदाजी करतो त्याच प्रमाणे येथेही फलंदाजी करावी असा सल्ला भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्‍य रहाणे याने दिला आहे.

यावेळी रहाणे म्हणाला की, मी पृथ्वी शॉला त्याच्या सुरुवातीच्या काळापासून खेळताना पाहात आलो आहे, तो एक उत्कृष्ट फलंदाज आहे. त्याच्यासोबत मी अनेक वेळा सराव केला असून त्याच्या खेळातील प्रगतीचेही मी निरीक्षण केले आहे. त्याची राष्ट्रीय संघात निवड झाल्यामुळे मला खरोखरीच आनंद झाला असून त्याने आपल्या कामगिरीवर कशाचेही दडपण न येऊ देता खेळ करावा अशी माझी इच्छा आहे.

गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघासाठी सलामीला लोकेश राहुल सोबत मयंक अग्रवाल अथवा पृथ्वी शॉ या दोघांपैकी कोणाला संधी दिली जाईल, याबद्दल सध्या मला कोणतीही माहिती नाही असे रहाणेने सांगितले. तसेच रहाणे पुढे म्हणाला की, वेस्ट इंडीज सारख्या संघांविरोधात खेळायला मिळणे ही या नव्या खेळाडूंसाठी खुप महत्वाची आणि चांगली संधी आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याकामगिरीचे दडपन न घेता मैदाणात चांगली फलंदाजी करावी आणि गोलंदाजी करताना वीना दबाव आणि दडपण गोलंदाजी करावी असेही तो पुढे म्हणाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)