पृथ्वी शॉचे शानदार शतक 

राजकोट – वेस्ट इंडिजविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात पृथ्वी शॉने विक्रमी कामगिरी केली आहे. पृथ्वी शॉने पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकावले आहे. पृथ्वीने ९९ चेंडूत शतक ठोकले असून यामध्ये १४ चौकारांचा समावेश होता. पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारा तो तिसरा युवा खेळाडू बनला आहे.

याआधी शिखर धवन आणि वेस्ट इंडिजचा ड्वेन स्मिथचा नंबर लागतो. शिखर धवनने मोहालीच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ८५ चेंडूमध्ये शतक झळकावले होते. तर वेस्ट इंडिजच्या ड्वेन स्मिथने केपटाऊनच्या मैदानावर साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ९३ चेंडूत शतक झळकावले होते.

-Ads-

दरम्यान, भारत सध्या २०४ धाव १ बाद खेळत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)