पृथ्वी शॉचे कसोटी क्रिकेटमधील पदार्पण निश्‍चित

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर

राजकोट: आजपासून (गुरुवार) सुरू होत असलेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडीज कसोटी यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने भारताचा अंतिम 12 खेळाडूंचा संघ जाहीर केला असून मुंबईकर पृथ्वी शॉ याला कसोटी पदार्पणाची संधी मिळणार आहे. तो लोकेश राहुलसह सलामीला उतरणार असून भारताकडून कसोटी पदार्पण करणारा शॉ हा 293वा खेळाडू ठरणार आहे.

-Ads-

बीसीसीआयने प्रथमच सामन्याच्या आदल्या दिवशी संघ जाहीर केला आहे. त्यामुळे वेस्ट इंडीजविरुद्घ सलामीला कोण उतरणार या प्रश्‍नाचे उत्तर मिळाले आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सौराष्ट्र क्रिकेटच्या मैदानावर उसळती खेळपट्टी बनवण्याची मागणी केली होती. त्यामुळे या सामन्यात वेगवान गोलंदाजांना अधिक पसंती असेल, तर तीनपैकी केवळ दोन फिरकीपटूंना संघात स्थान मिळेल, असा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे.

पृथ्वी शॉला संघात संधी मिळाल्यामुळे मयंक अग्रवालचे कसोटी पदार्पण मात्र लांबणीवर पडले आहे. तसेच मोहम्मद सिराजला देखील अंतिम संघात स्थान मिळालेले नाही. संघात तीन वेगवान गोलंदाजांनाही स्थान देण्यात आले आहे. पृथ्वी शॉने स्थानिक क्रिकेट सामन्यांत भरपूर धावा केल्या आहेत. त्याशिवाय त्याने भारताला 19 वर्षांखालील विश्वचषकही जिंकून दिला आहे. त्याने 14 प्रथम श्रेणी सामन्यांत 56.27च्या सरासरीने 1418 धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शॉचा भारतीय संघात समावेश होता, परंतु त्याला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये संधी मिळाली नव्हती.

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ – लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्‍य रहाणे, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव व शार्दूल ठाकूर.

बुमराह, भुवीला संधी द्यायला हवी होती – गावस्कर

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज कसोटी मालिकेसाठी संघ नुकताच जाहीर करण्यात आला. भारताचे अव्वल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांना या संघातून वगळण्यात आले असून महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी एक लेख लिहून त्याबाबत आपली नाराजी प्रकट केली आहे. या लेखात सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे की, बुमराह आणि भुवनेश्वर कुमारला विश्रांती हवी होती, तर त्यांना एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ती द्यायला हवी होती. या दोन्ही वेगवान गोलंदाजांची कसोटी सामन्यात भारतीय संघाला गरज आहे. ज्या अर्थी त्यांना वगळण्यात आले आहे, त्या अर्थी निवड समिती कसोटी मालिकेला महत्त्व देत नाही, अशा शब्दात गावस्करांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)