पृथ्वी एडिफाईस आंतर माहिती तंत्रज्ञान टी-20 स्पर्धेत 16 संघांचा सहभाग

 एक लाख रुपयांची पारितोषिके

पुणे – व्हाईट कॉपरतर्फे पृथ्वी एडिफाईस करंडक आंतर माहिती तंत्रज्ञान टी-20 अजिंक्‍यपद क्रिकेट स्पर्धेचे उद्यापासून (शनिवार) आयोजन करण्यात आले असून स्पर्धेत पुण्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील 16 संघ सहभागी झाले आहेत. दीड महिना चालणाऱ्या या स्पर्धेचा शुभारंभ आज होणार असून अंतिम सामना 29 एप्रिल 2018 रोजी होणार आहे.
स्पर्धेतील सामने पीवायसी हिंदू जिमखाना व नेहरू स्टेडियम या मैदानावर दर आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी होणार आहेत.

या स्पर्धेचे संयोजन आणि आयोजन व्हाईट कॉपर प्रा. लि. कंपनी तर्फे करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती देताना पृथ्वी एडिफाईसचे अध्यक्ष अभय केळे म्हणाले की, सध्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेची सुरुवात होणार असल्याने सर्वच वातावरण क्रिकेटमय झाले आहे. या पार्श्‍वभूमीवरच आयटी कंपन्यातील खेळाडूंना या स्पर्धेद्वारे आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार आहे.

कॉग्निझंट, माईंडट्री, पीटीसी आणि टिएटो हे 4 नवीन संघ या वर्षी स्पर्धेत भाग घेत आहेत. तसेच ऍमडॉक्‍स्‌ डेव्हलपमेंट सेंटर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, पर्सिस्टन्ट सिस्टीम्स्‌, सनगार्डएएस, एफआयएस ग्लोबल, जॉन्सन कंट्रोल ऑफ इंडिया, विप्रो, बिटवाईझ, सिमॅन्टेक, यार्डी, मर्क्‍स, व्हेरिटास, या शहरातील आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे एकूण 16 संघ स्पर्धेत सहभागी होत आहेत.

आठवड्याच्या शनिवारी व रविवारी होणाऱ्या या स्पर्धेत 16 संघांचे चार गट तयार करण्यात आले आहेत. साखळी आणि बाद फेरी पद्धतीने स्पर्धेचे सामने होणार आहेत. प्रत्येक गटात साखळी सामने होणार असून प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ बाद फेरीत प्रवेश करतील. ऍमडॉक्‍स आणि यार्डी यांच्यातील सामन्याने स्पर्धेचा शुभारंभ होणार असून त्यानंतर पर्सिस्टन्ट विरुद्ध मर्क्‍स हा दुसरा सामना रंगणार आहे. हे सामने शनिवार, 24 मार्च रोजी, पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब येथे होणार आहेत.

खेळाडूंचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी या वर्षी स्पर्धेची पारितोषिक रक्‍कम वाढविण्यात आली असून स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व तब्बल 40 हजार रुपयांचे, तर उपविजेत्या संघाला करंडक व 30 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. मालिकावीर खेळाडूला करंडक व 5 हजार रुपये, तर सर्वोत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज यांनाही करंडक व 5 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या शिवाय स्पर्धेत होणाऱ्या 31 सामन्यांसाठी सामनावीर हा किताब देण्यात येणार असून सर्वांना करंडक देण्यात येणार आहे.

स्पर्धेची गटवारी-

गट अ- कॉग्निझंट, सनगार्ड, टिएटो, विप्रो;
गट ब- ऍमडॉक्‍स्‌, बिटवाईझ, सिमॅन्टेक, यार्डी;
गट क- जेसीआय, पर्सिस्टन्ट, मर्कस्‌, व्हेरिटास;
गट ड- एफआयएस, माईंडट्री, पीटीसी, टीसीएस.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)