पृथ्वीजवळून गेला पाणघोड्याच्या आकाराच लघुग्रह 

नवी दिल्ली – 22 डिसेंबर रोजी पृथ्वीजवळून एक लघुग्रह पुढे गेला याबाबतची माहिती कुठे ही प्रसिद्ध झाली नव्हती. हा लघुग्रह सुरक्षित अंतरावरून गेला असल्याने त्यापासून पृथ्वीला कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता. त्यामुळे त्याच्या बाबद जास्त चर्चाही झाली नव्हती. मात्र, नासाच्या रडार यंत्रणेने या लघुग्रहाची काही छायाचित्रे घेतली आहेत. रडारने घेतलेल्या या फोटोंमध्ये हा लघुग्रह एखाद्या पाणघोड्याच्या आकाराचा वाटतो.

या लघुग्रहाला “2003 एसडी 220′ असे नाव देण्यात आले आहे. गेल्या 400 वर्षांच्या काळात तो प्रथमच पृथ्वीच्या अगदी जवळून गेला आहे. त्यावेळी त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर 2.9 दशलक्ष किलोमीटरचे होते. आता तो 2070 मध्ये असा पृथ्वीजवळून जाणार आहे. यापूर्वी 2015 मध्ये नाताळच्या पूर्वसंध्येला हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून गेला होता. “नासा’च्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीने याबाबतची माहिती ट्विटरवरून दिली आहे. हा लघुग्रह सुमारे 1 मैल म्हणजेच 1.6 किलोमीटर लांबीचा आहे. कॅलिफोर्नियातील गोल्डस्टोन अँटेनाच्या सहाय्याने त्याची रडार प्रतिमा टिपण्यात आली होती.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)