पूल, बांधणे कामाचे उद्‌घाटन सोहळा खा. उदयनराजे याच्या हस्ते संपन्न

सातारा – श्री.छ. राजमाता सुमित्रा राजे उद्याना शेजारील नव्याने बांधलेल्या पुलाचे उद्‌घाटन खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले . सातारा नगरपरिषदेच्या संकल्पनेतून व निशांत पाटील यांच्या पाठपुराव्याने श्री.छ. राजमाता सुमित्राराजे उद्याना लगत पश्‍चिम-दक्षिण बाजूस नव्या योजने अंतर्गत पुलाच्या कामाचा लोकार्पण सोहळा करण्याचे योजिले होते.

कानिष्क हॉल कडून रिमांड होमकडे जाणाऱ्या अरुंद पुलाचे काम अनेक दिवस रखडले होते. यामुळे अनेक दिवस नागरिकांची गैरसोय होत होती. शासनाकडून या कामासाठी 45 लाख रुपये मंजूर झाले होते आता ते काम पूर्णत्वास गेल्याची माहिती नगरसेवक निशांत पाटील यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, बांधकाम सभापती मनोज शेंडे, नियोजन समिती सभापती स्नेहा नलवडे, सभागृह गट नेत्या स्मिता घोडके, मुख्याधिकारी शंकर गोरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)