पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षेत एकवीरा विद्यालयाचे यश

कार्ला – सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षेत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या कार्ला येथील श्री एकवीरा विद्यालयातील आठवीच्या तीन विद्यार्थ्यांनी पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत खुल्या संवर्गातून स्थान मिळवले.

यामध्ये वेहरगाव येथील प्रेम संदीप बोरकर, दहिवली येथील दिया विजय येवले, वाकसई येथील तेजल हरिश्‍चंद्र केदार या तीन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत नाव मिळवून संस्था व शाळेचे नाव उज्वल केले.

-Ads-

या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शक शिक्षक उमेश किसन इंगुळकर यांनी सर्व विषयाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे नूमवि संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, सचिव संतोष खांडगे, शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे, मुख्याध्यापक गुंडप्पा साखरे, माजी सभापती शरद हुलावळे, माजी पंचायत समिती सदस्य दिपक हुलावळे, कार्ला सरंपच अश्‍विनी हुलावळे, उपसरपंच नंदा हुलावळे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह कार्ला परिसरातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)