पूर्वीच्या सरकारकडे कार्यसंस्कृतीचा अभाव असल्याने भारत पिछाडीवर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी : नेहरू-गांधी घराण्यांवर केली अप्रत्यक्ष टिका 

नवी दिल्ली – यापूर्वीच्या सरकारांमध्ये बडी बडी नावे होती, पण कार्यसंस्कृतीचा अभाव होता. त्याचमुळे भारत मागे राहिला, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे नेहरू-गांधी घराण्यांवर टिका केली. सन 2014 मध्ये भाजप सत्तेवर आल्यानंतर आता परिस्थिती बदलली आहे, असे ते म्हणाले.

नरेंद्र मोदी म्हणाले, 1971च्या निवडणुकीच्या काळात “गरिबी हटाव’च्या घोषणा देण्यात आल्या. मात्र गरिबी हटली नाही, कारण त्याचा व्होट बॅंकेवर परिणाम झाला असता. जर गरीब आणि वंचितांना शौचालय, गॅस कनेक्‍शन, वीज पुरवठा आणि बॅंक खाते अशा प्राथमिक सुविधा दिल्या असत्या तर गरीब लोक स्वत:च स्वत:ची गरिबी दूर करतील. आताच्या सरकारने मोठी ध्येय समोर ठेवून कणखर निर्णय घेतले आहेत. तसेच नवीन क्षमता, संसाधने, संस्कृती आणि सुरक्षा यावर लक्ष केंद्रित आहे.

यापूर्वीच्या सरकारकडे पुरेसा निधी असूनही कार्य करण्याची ओढ नव्हती. त्यांच्याकडे समस्यांवरील उपाय करण्यास आणि अंमलात आणण्याची कळकळ नव्हती. आज तीच नोकरशाही, तीच सिस्टिम आणि तीच जनता आहे. पण विकासाला मात्र वेग आला आहे, असे त्यांनी सांगितले.

युवा पिढी प्रतिभाशाली 
आमची युवा पिढी प्रतिभाशाली असून मेहनत करण्याची तिची वृत्ती आहे. आपल्याकडे नैसर्गिक संसाधने विपुल प्रमाणात आहेत. पण तरीही आपल्या देशाची भरभराट का झाली नाही? असा प्रश्‍न त्यांनी याप्रसंगी विचारला. 
आयकर भरणारांच्या संख्येत झालेली वाढ, जीएसटीखाली नोंदणी झालेल्या संस्था आदीची आकडेवारी सादर करताना त्यांनी सांगितले की स्वातंत्र्यानंतर 67 वर्षांनी शौचालय असणाऱ्या घरांचे प्रमाण 38 टक्के होते. ते आता 95 टक्‍क्‍यांपर्यंत गेले आहे.

—————————— ————–


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)