पूर्ववैमनस्यातून युवकाचा खून

  • ताजे गावातील घटना : दुचाकी आडवून कोयत्याने केले वार

कामशेत – पूर्ववैमनस्यातून एका 22 वर्षीय युवकाचा कोयत्याने डोक्‍यात वार करून निर्घृण खून केला. ताजे गावच्या हद्दीत रविवारी (दि. 3) पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्यातील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

किरण बाळू कोरडे (वय 25, रा. सज्जनवाडी, ताजे, ता. मावळ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी सोमनाथ बाळू कोरडे (वय 22) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सहा जणांवर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्‍यातील सज्जनगड येथील किरण कोरडे पिंपरी येथील एका कॉपी शॉपमध्ये कामास होता. तो रविवारी पहाटे तीनच्या सुमारास कामावरून घरी येत असताना कामशेत जवळील ताजे गावच्या हद्दीत काशिनाथ केदारी यांच्या घराच्या समोरील रस्त्यावर आरोपी नितीन ज्ञानेश्‍वर केदारी, बाळू शंकर केदारी, नितीन अर्जुन केदारी, बबन विठ्ठल केदारी, उमेश चंद्रकांत केदारी (सर्व. रा. ताजे, मावळ) व काळू-बाळू पिंपळे (रा. पिंपळोली, मावळ) यांनी किरण कोरडे याची दुचाकी अडवून त्याच्या तोंडावर, डोक्‍यावर हातावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले.

त्यावेळी घटना घडते वेळी मयताचा चुलत भाऊ अमोल कोरडे याने किरण कोरडे याला मारत असल्याचे फिर्यादी सोमनाथ यांना मोबाईलवरून कळविले.घटनेची माहिती कळताच सोमनाथ कोरडे घटनास्थळी स्थळी पोहचले. जखमी किरण कोरडे यास उपचारासाठी सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच किरणचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले. या गुन्ह्यातील तीन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले. आणखी तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या संदर्भात सहायक पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप करीत आहेत.

दरम्यान, ताजे गावच्या हद्दीत मागील महिन्यात एका महिलेचा तिच्या पतीने डोक्‍यात कोयत्याने वार करून हत्या केली होती. अल्पावधीतच या गावात खुनाची दुसरी घटना घडली असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)