पूर्ववैमनस्यातून युवकाचा धारधार शस्त्राने खून

केळगाव येथील घटना : चार जणांना चौकशीसाठी घेतले ताब्यात
आळंदी  – केळगाव ( हनुमानवाडी ता. खेड) येथील हॉटेल लाईट हाऊस समोर पूर्ववैमनस्याच्या भांडणातून धारदार हत्यारे व इतर शस्त्राने एका 26 वर्षीय युवकावर सपासप वार करून खून करण्यात आला.ही घटना शनिवारी (दि. 12) रात्री साडेआठ ते पावणेनऊच्या सुमारास घडली. दरम्यान, मुख्य आरोपी आणि त्याचे इतर साथीदार फरार असून चार जणांना आळंदी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यत घेतले आहे.
संग्राम अर्जुन आघाव (वय26, सध्या रा. कैवल्य सोसायटी, आळंदी, मुळ गाव बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर मुख्य आरोपी वजय वीरकर व त्याचे साथीदार फरार आहेत. तर विकास मारूती वहिले (वय 38), सुधीर बबन वहिले (वय31), संतोष दामु वहिले (वय40, सर्व रा. केळगाव, (ता. खेड), व सत्यपाल शेषराव हरेल (वय 28, रा. देहूफाटा, ता. हवेली) असे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्यांचे नाव आहे.
दरम्यान, शनिवारी रात्री सर्व आरोपींनी मिळुन संग्राम आघाव यास गाठले व त्याला काही समजण्याच्या आत धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करून पसार झाले. त्यानंतर आघाव यास भोसरी येथील खासगी हॉस्पीटमध्ये गंभीर अवस्थेत नेले असता डॉक्‍टरांनी त्यास मृत घोषित केले.आळंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक डी. एल. शिंदे पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)