पूर्ववैमनस्यातून नगरसेवकावर गोळीबार करणाऱ्याचा जामीन फेटाळला

गणेश विसर्जन मिरवणूकीत केले होते हे कृत्य


जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एन.के. मणेर यांचा आदेश

पुणे- पूर्ववैमनस्यातून गणेश विसर्जन मिरवणूकीत नगरसेवकावर गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात मुख्य आरोपीचा जामीन न्यायालयाने फेटाळला. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एन.के.मणेर यांनी हा आदेश दिला आहे.
बबलू वसंत गवळी (वय 44, रा. भवानी पेठ) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. या प्रकरणात आणखी अकरा जणांवर गुन्हा दाखल आहे. विवेक महादेव यादव (वय 35, न्यू मोदीखाना) असे घटनेत जखमी झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. त्यांचे भाऊ चेतन (वय 32) यांनी याबाबत लष्कर पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 15 सप्टेंबर 2016 रोजी रात्री 9.45 ते 10 च्या दरम्यान न्यू मोदीखान येथील सार्वजनिक रस्त्यावर घडली. विवेक हे कॅन्टोन्मेट बोर्डाचे नगरसेवक आणि न्यू मोदीखाना उत्सव संवर्धक गणपती मंडळाचे अध्यक्ष आहेत. गणेश विसर्जन मिरणूकीतून ते निघाले होते. गवळी आणि साथीदार या मिरवणूकीत सहभागी झाले. सन 2014 मध्ये झालेल्या भांडणाच्या कारणावरून गवळी याने गोळी झाडून विवेक यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत विवेक जखमी झाल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. पोलिसांनी यामध्ये 2016 मध्येच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात गवळी याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. गवळी हा मुख्य आरोपी असून, तो सराईत आहे. त्याच्यावर पुणे शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये सात गुन्हे दाखल आहेत. पूर्ववैमनस्यातून अर्जदार आणि आरोपी यांच्यात यापूर्वीही खुनी हल्ले झालेले आहेत. पुन्हा असे हल्ले होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. नजीकच्या काळात सण, गणेशउत्सव आहे. जामीन मिळाल्यास तो दहशत माजवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करण्याची आणि साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्‍यता आहे. यासाठी त्याचा जामीन फेटाळावा, असा युक्तीवाद ऍड. बोंबटकर यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने गवळी याचा जामीन फेटाळला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)