पूर्ववैमनस्यातून दुचाकीने उडवले

पिंपरी – जुन्या भांडणाचा राग मनात धरून जाणीवपूर्वक एकाला दुचाकीने उडवले. ही घटना शनिवारी (दि. 24) रात्री साडेआठच्या सुमारास हिंजवडीमधील ने-हे दत्तवाडी येथे घडली. यातील दोन आरोपींना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत विशाल भालचंद्र पाटील यांनी फिर्याद दिली. रुपेश दत्तात्रय तावरे आणि राहुल एकनाथ पाटील अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल पाटील यांचा भाऊ अजित पाटील शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास दत्तवाडीमधील एक्झर्बिया सोसायटीच्या आवारातून रस्त्याच्या डाव्या बाजूला उभे होते. भरधाव वेगात दुचाकीवरून आलेल्या वरील आरोपींनी अजित पाटील यांना जोरदार धडक दिली. यामध्ये अजित पाटील गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी न थांबता दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. अजित पाटील आणि आरोपी यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. याचा राग मनात धरून सूडाच्या भावनेतून हा अपघात केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)