पूर्ववैमनस्यातून दगडाने मारहाण

पिंपरी – जुन्या भांडणाच्या रागातून तिघांनी मिळून एकाला मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रहाटणीतील गोडांबे कॉर्नर येथे घडली.

काशिनाथ विठोबा शिंदे (वय-55, रा. काळेपडळ, हडपसर) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी राज अब्दुल पठाण (वय -19, रा. डोंगरगाव, लोणावळा) याला अटक केली आहे. अन्य दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय शिंदे असे मारहाण झालेल्या मुलाचे नाव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अक्षय आणि आरोपी यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपीने त्याच्या दोन साथीदारांसह अक्षय याच्याशी पुन्हा वाद घातला. त्या भांडणात राज याने अक्षयला दगडाने मारहाण केली. यामध्ये अक्षय गंभीर जखमी झाला. यावरून त्याचे वडील काशीनाथ यांनी वाकड पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी राज याला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)